संवाद विद्यार्थ्यांशी
श्री कोचिंग क्लासेस वैराग आयोजित संवाद विद्यार्थ्यांशी या मार्गदर्शन मालेतील पहिले पुष्प श्री कल्याण तांबे सर यांनी ओवले.
आजच्या मार्गदर्शनामध्ये आपण शिक्षण हे इतर कोणासाठी नाही तर ते स्वतः साठी घेणं गरजेचं आहे. शिक्षण घेताना जेवढा संघर्ष मोठा असतो तेवढेच यश देखील मोठे असते. शिक्षणासाठी परस्थिती कधीच आडवी येत नसते.चांगले मित्र जोपासा कारण मित्र हाच आपला चांगला विश्लेषक असू शकतो. आपले प्रयत्न प्रामाणिक असतील तर अपयश आलं तरी आपण एका प्रकारे विजेतेच ठरत असतो कारण अपयश म्हणजे शेवट नसतो तर ती वाट यशाकडे जाणार राजमार्ग ठरू शकते . हे सांगताना त्यांनी सचिन तेंडुलकर, महात्मा गांधी, महेंद्रसिंग धोनी, सुधा मूर्ती, सिंधुताई सपकाळ याची उदाहरणे दिली.
या डिजिटल युगामध्ये वाचनाची आवड जोपासणे किती गरजेचं आहे याच महत्त्व सांगीतलं. इच्छित ध्येय प्राप्त झाल्यानंतर आपण कुटुंब व समाजाचं देण लागतो म्हणून आपल्या कमाईमधील काही भाग समाजहितासाठी खर्च केला पाहिजे. हे सांगत असताना त्याच्या बालपणीचे कांही प्रसंग सांगितले.
हे सांगत असताना वाचाल तर वाचाल व अर्थ असेल तर अर्थ आहे हेही मुलांना विविध दाखले देऊन पटवून दिलं.
अपयशाच डाग पुसून टाकायचा असेल स्वतःची ओळख स्वतः निर्माण करायला शिका. आपले छंद जोपासा.
बऱ्याच वेळा आपणास केवळ आपुलकीचे चार शब्द देखील हत्तीचे बळ देतात हे कवी कुसुमाग्रज याची कणा या कवितेतुन सांगितले. यावेळी तांबे सर यांनी ग्रंथालयासाठी पुस्तके भेट म्हणून दिली.
यावेळी M.B.B.S मध्ये निवड झालेला क्लासचा माझा विध्यार्थी आदित्य गांधी याचा सत्कार करण्यात आला.
यावेळी ऑगस्ट महिन्यात झालेल्या टेस्ट मधील प्रथम पाच विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी क्लासच्या संचालिका अंजली माने, राजवैभव गांधी व इ ९वी, १०वी चे विध्यार्थी उपस्थित होते. प्रस्तावना माने सर यांनी केले. कानडे सर यांनी आभार व्यक्त केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली भालशंकर हिने केले.